Sai Tamhankar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar : सई ताम्हणकर अन् अनिशचं नातं तुटलं, अभिनेत्री काय म्हणाली?

Sai-Anish Breakup : ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या लव्ह लाइफबद्दल मोठा खुलासा केला आहे. नेमकं ती काय बोलली जाणून घ्या.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) कायमच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. सई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

सध्या सई आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. अनेक दिवसांपासून सईचा ब्रेकअप झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आता मात्र स्वतः सईने याबाबत मोठा खुलासा केला आहे. सई निर्माता अनिश जोगला (Anish Joag) काही महिन्यांपासून डेट करत होती. मात्र आता एका मिडिया मुलाखतीत तिने आपला ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी सईने एक पोस्ट केली होती. ज्यातून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. तिने पोस्टमध्ये लिहिलं होत की, मी सिंगल आहे. ही माझी निवड आहे. असं म्हणतं तिने #Truestroy असं लिहिलं होते.

एका मीडिया मुलाखतीत सईने तिच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला आहे. ती म्हणाली की, "हो... आम्ही वेगळे झालो आहोत. हा आमचा दोघांचा एकत्र निर्णय आहे. तो माझ्या आयुष्यात नेहमी खास राहील आणि त्याच्या चांगल्याची प्रार्थना करेन. मला खात्री आहे त्यालाही असचं वाटत असणार. "

सईला खरी ओळख 'दुनियादारी' या चित्रपटाने मिळवून दिली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. सईने मराठीसोबतच हिंदीमध्येही काम केलं आहे. सई ताम्हणकरचे इंस्टाग्राम 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती आपल्या सोशल मीडियावर तिच्या लूकचे फोटो टाकत असते. जे पाहून चाहते घायाळ होतात. तिने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT