Actress  saam tv
मनोरंजन बातम्या

Actress : दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही Kiss करत राहिला; अभिनेत्याच्या 'त्या' घाणेरड्या कृत्याने खळबळ, अभिनेत्रीने रडत रडत पतीला केला फोन अन्...

Marathi Actress Recalls Uncomfortable Kiss Scene : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे, ज्यात तिचा सहकलाकार अभिनेता तिला जबरदस्तीने किस करत होता. नेमकं घडलं काय, पाहुया.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला भयानक किसिंग सीन शूटिंगचा अनुभव

किसिंग सीनच्या नावाखाली को-स्टारने ओलांडल्या मर्यादा

अभिनेत्रीने रडत रडत पतीला केला फोन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या कामामुळे चांगलीच चर्चे आहे. ओटीटी विश्वात तिने स्वतःची नवीन ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती 'डाळिंब' (DALIMB) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात नुकताच एका मीडिया मुलाखतीत प्रियाने शूटिंग दरम्यान 'किसिंग सीन' शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे, जो वाचून तुम्ही अस्वस्थ व्हाल.

नेमकं घडलं काय?

प्रिया बापट 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझ्या सुरुवातीच्या काळातील एका चित्रपटात एक किसिंग सीन होता आणि स्क्रिप्ट वाचनाच्या वेळेपासूनच त्याबद्दल माझ्या मनात शंका आणि चिंता होती. मी दिग्दर्शकाला सतत विचारत होते की, याची इथे काय गरज आहे? प्रश्न मला किस करायचे आहे की नाही, याचा नव्हता; तर प्रश्न असा होता की, याचे समर्थन कसे करता येईल? कारण ते इथे अजिबातच योग्य वाटत नव्हते... मात्र चित्रपटाच्या गरजेनुसार मी किसिंग सीन करण्यास होकार दिला. "

प्रिया बापट पुढे म्हणाली की, "नंतर असे काही क्षण आले की जेव्हा अभिनेता गाण्यात सुधारणा करत राहिला आणि तो मला किस करत राहिला आणि मी असणं, का मला माहित नाही, त्या वेळी मी स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. कारण मला हे कसे हाताळायचे हे माहित नव्हते...पण हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्याने माझ्याशी वैयक्तिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सतत नकार देऊनही तो नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी मला भेटण्यासाठी आग्रह करायचा..."

प्रिया बापटने पुढे खुलासा केला की, त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये सुरू होते. जेव्हा प्रियाने रडत रडत तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कॉमतला घडलेला सर्व प्रसंग सांगितला, तेव्हा तो ताबडतोब मुंबईहून भोपाळला तिच्या जवळ आला आणि तीन दिवस त्याने तिला खंबीर पाठिंबा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Sunday Horoscope : अडचणीतून सहज सुटाल, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT