Prajakta Mali Wishes Raj Thackeray Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Wishes Raj Thackeray: राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्राजक्ता माळीने केली खास पोस्ट शेअर

Raj Thackeray Birthday: राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ मनसे कार्यकर्त्यांसह काही मराठी सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Prajakta Mali Post On Raj Thackeray Birthday: राज्याच्या राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले राज ठाकरे. राज ठाकरे यांची ओळख म्हणजे राजकारणी आणि कलाकार. राज ठाकरे यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासूनच त्यांच्या दादर येथील निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ मनसे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. अशातच काही मराठी सेलिब्रिटींनीही राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे नाते फार घनिष्ठ आहे. अनेकदा मराठी सेलिब्रिटी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतात. अशातच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्राजक्तानं राज ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…शुभेच्छा”

प्राजक्ताने गेल्या वर्षी ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. या ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला प्राजक्ताने विशेष राज ठाकरे यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते त्या ब्रँडचे उद्घाटन केले. नेहमीच प्राजक्ता राज ठाकरे यांच्या संपर्कात असते.

अनेकदा प्राजक्ताने राज ठाकरे यांच्या सभेलाही उपस्थिती लावली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सभेतील फोटोज ही शेअर केले होते. प्राजक्ता आणि ठाकरे कुटुंबीयांतील नाते फारच चांगले आहे, त्यांच्यातील कौटुंबिक नात्यात आदर, प्रेम आणि जिव्हाळा आहे. काही दिवसांपुर्वी प्राजक्ताने शिवतिर्थावर देखील भेट दिली होती. त्यावेळी सोशल मीडियावर प्राजक्ता मनसे पक्षात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी (१३ जून) रात्री शिवतीर्थावर केक घेऊन पोहचले. तेथे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने घोषणा सुरू केल्या. मात्र, राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना फटकारलं. “आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका... माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे.” असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा शांत झाले. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT