Prajakta Mali  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : 'फुलवंती' आता तुमच्या घरी, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

Phullwanti OTT Release : प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट थिएटरमध्ये खूप गाजत आहे. आता हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्राची लाडकी प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या 'फुलवंती' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'फुलवंती'ने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. सर्वत्र प्राजक्ताचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'फुलवंती'च्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

'फुलवंती' (Phullwanti OTT Release) आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये 'फुलवंती'ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 'फुलवंती' एका महिन्यातच ओटीटीवर पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. प्राजक्ताने स्वतः पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र हा चित्रपट रेंटवर असल्यामुळे तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी 149 रुपये मोजावे लागणार आहे.

'फुलवंती'ने प्राजक्ता माळीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. तसेच या चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार देखील पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी चित्रपटासाठी एकही पैसा घेतला नाही आहे. 'फुलवंती'मध्ये प्राजक्ता माळीसोबत श्मीर महाजनी देखील मुख्य भमिकेत पाहायला मिळत आहेत.

प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या अदांनी चाहते घायाळ होतात. प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. प्राजक्ता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडते. तिचा डान्स महाराष्ट्राला वेड लावणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT