Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

Phullwanti Ott Performance : प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. त्याने चक्क हॉलिवूड सिनेमाला मागे टाकून नवीन रेकॉर्ड बनवला आहे.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याच्या खास अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. सध्या प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. आता या चित्रपटाने ओटीटीवर (OTT ) देखील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.

प्राजक्ता माळीने व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार, 8 नोव्हेंबरपासून 'फुलवंती' (Phullwanti) चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 'फुलवंती' चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर पाहता येत आहे. मात्र तो पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे भरावे लागत होते. मात्र आता 'फुलंवती'चित्रपट तुम्हाला मोफत ओटीटीवर पाहता येणार आहे. यासंबंधीचा खास एक व्हिडीओ प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओ तिने 'फुलवंती' या चित्रपटाने हॉलिवूड सिनेमाला मागे टाकले असल्याचे सांगितले आहे. ओटीटीवर 'फुलवंती'ने नवा रेकॉर्ड रचला आहे. TVOD मध्ये पॅन इंडिया लेव्हला 'फुलवंती' चित्रपट पहिल्या रँकवर सलग २ आठवडे होता. मराठीतील सर्वाधिक तिकीट काढून बघितला गेलेला चित्रपट म्हणून याने रेकॉर्ड तयार केला आहे. 'फुलवंती'ने हॉलिवूड चित्रपटाला मागे टाकले आहे. यावेळी हॉलिवूड चित्रपट दुसऱ्या रँकला होता.'फुलवंती' या चित्रपटाचा हा सातवा आठवडा आहे.

'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबतच गश्मीर महाजनी देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता माळीने केली आहे. तसेच आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT