Actress Prajakta Gaikwad Politics Entry CM Eknath Shinde Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Gaikwad Politics Rumors: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने घेतली मुख्यमंत्र्यांची ‘ग्रेट भेट’; राजकारणात जाणार का? चर्चांना उधाण

Actress Prajakta Gaikwad Joins Eknath Shinde Party Shiv Sena Photo Viral: चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील नातं हे फारच घनिष्ठ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सेलिब्रिटींनी एन्ट्री मारली आहे. सेलिब्रिटींच्या एन्ट्रीने अनेकदा चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prajakta Gaikwad marathi actress politics entry CM Eknath Shinde : चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील नातं हे फारच घनिष्ठ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सेलिब्रिटींनी एन्ट्री मारली आहे. सेलिब्रिटींच्या एन्ट्रीने अनेकदा चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

नुकतंच काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन सेलिब्रिटी हार्दिक जोशी, माधव देवचाके, अमोल नाईक, प्रतीक पाटील, अभिनेत्री आदिती सारंगधर यांनीही यावेळी शिंदे गटात प्रवेश केला. (Marathi Celebrity) एकाच वेळी एवढ्या सेलिब्रिटींनी पक्षप्रवेश केल्याने सोशल मीडियावर त्यांच्या पक्षप्रवेशाची बरीच चर्चा सुरू आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या पक्षप्रवेशाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली. टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं काल वर्षा बंगल्यावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिने तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. या फोटोला प्राजक्ताने “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर ग्रेट भेट” असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. सध्या अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. (Maharashtra Cm Eknath Shinde)

सोशल मीडियावर प्राजक्ताचा फोटो पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा (Shiv Sena) हाती घेतल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तिनं या भेटीबद्दल फार काही लिहिलं नसलं तरी, नेटकऱ्यांनी मात्र या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेकांनी तिच्या या फोटोवर सकारात्मक आणि नकारात्मक देखील कमेंट्स केल्या आहेत.

‘भावी आमदार’ म्हणून तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. ‘ताई मंत्री पद मागता का सरकारकडे’ अशी कमेंट देखील एका युजर्सने केली. तर सोबतच प्राजक्ता मंत्रीपद घेणार वाटतं अशी देखील चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. तर काहींनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतलेली पाहून तिला ट्रोल देखील केलं आहे.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने काही दिवसांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं असून तिने काही मालिकेंमध्येही काम केलं आहे. सध्या प्राजक्ता अभिनेते, डॉक्टर आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नाटकाच्या काही प्रयोगानंतर तिने नाटकातून माघार घेतली आहे. सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता एका साऊथ सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT