Pooja Sawant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant : मराठमोळा शृंगार अन् हलव्याचे दागिने; परदेशात साजरी केली पूजानं मकर संक्रांत, पाहा नवऱ्यासोबतचा खास VIDEO

Pooja Sawant First Makar Sankranti : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने परदेशात तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्री पूजा कायमच तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या ती नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला राहते. त्यामुळे पूजाने आपली पहिली मकर संक्रांत (Makar Sankranti ) आपल्या कुटुंबासोबत परदेशात साजरी केली. या गोड क्षणाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

पूजाचा मकर संक्रांत स्पेशल लूक

मकर संक्रांतीसाठी दोघांनीही पारंपरिक लूक केला होता. दोघेही काळ्या रंगाच्या पोषाखात पाहायला मिळाले. पूजाने काळ्या रंगाची पैठणी नेसली तर सिद्धेशने (Siddhesh Chavan) काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूपच छान दिसत आहे. पूजाने सुरेख साज श्रृंगार केला आहे. तिने विशेषता हलव्याचे दागिने घातले आहेत. त्यांनी एकत्र पूजा देखील केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पूजाचे आई-बाबा, भाऊ-बहीण सर्व ऑस्ट्रेलियाला आहेत. पूजाच्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. तिने नवऱ्यासोबत खास फोटोशूट देखील केले आहे. आई त्यांना छान ओवाळताना दिसत आहे. या दोघांनी भन्नाट फोटोशूट केले आहे. पूजाच्या या व्हिडीओवर सध्या चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पूजाचा नवरा सिद्धेश ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. यांनी 28 फेब्रुवारी 2024 ला लग्नगाठ बांधली आहे. पूजा सावंतचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांचा एकदम थाटात विवाह सोहळा पार पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT