Pooja And Siddhesh Visit Siddhivinayak Temple Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नानंतर Pooja Sawant आणि Siddhesh Chavan सिद्धिविनायकाच्या चरणी, VIDEO व्हायरल

Pooja And Siddhesh Visit Siddhivinayak Temple: लग्नानंतर पूजा सावंतच्या सासरी म्हणजेच सिद्धेशच्या घरी सत्य नारायणाची पूजा पार पडली. त्यानंतर आता या कपलने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं.

Priya More

Pooja Sawant And Siddhesh Chavan:

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) पूजा सावंत 28 फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) विवाहबंधनात अडकली. मोठ्या थाटामाटामध्ये पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा विवाहसोहळा (Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding) पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा सावंतच्या सासरी म्हणजेच सिद्धेशच्या घरी सत्य नारायणाची पूजा पार पडली. त्यानंतर आता या कपलने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं.

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी आज मुंबईतल्या प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या कपलने बाप्पाचे दर्शन घेत प्रार्थना केली. यावेळी पूजा सावंतने लाल रंगाची काठ असलेली रॉयल ब्ल्यू रंगाची साडी नेसली होती. लाईट मेकअप, मोकळे केस, हातामध्ये हिरवा चुडा, गळ्यात मंळसूत्र, कानात झुमके असा पूजा सावंतने लूक केला होता. तर सिद्धार्थने रेड आणि गोल्डन कलरचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. दोघेही यावेळी खूपच क्युट दिसत होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना पूजाने सांगितले की, 'लग्नापूर्वी बऱ्याचदा आले आहे ते सुद्धा चित्रपटासाठी. पण आज खूपच स्पेशल आहे. लग्नानंतर आम्ही आताच दर्शनासाठी आलो आहोत.' तर सिद्धेशने सांगितले, 'मी देखील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खूप वेळा आलो आहे. गणपती बाप्पा माझे फेवरेट आहेत. मी नेहमी दर्शनसाठी येतच असतो.' सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचे हे अरेंज मॅरेज आहे. २८ नोव्हेंबरला पूजा सावंतने इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड सिद्धेशसोबतचा फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनान्ससंबंधित काम करतो.पूजा आणि सिद्धेशने २८ फेब्रुवारीला लग्न केले. त्याच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT