Mrunal Dusanis Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

Mrunal Dusanis New Business: मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस ४ वर्षानंतर भारतात परतली आहे. भारतात परतताच मृणालने स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे.

Siddhi Hande

मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस नुकतीच चर्चेत आली आहे.मृणालने मराठी मालिकाविश्वात खूप नावलौकिक कमावले आहे. मृणाल चार वर्षानंतर भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर मृणालने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. मृणालने आधी मालिकेत पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. त्यानंतर आता मृणालने नवऱ्यासोबत नवीन व्यवसाय सुरु केला आहे. (Mrunal Dusanis Restaurant)

अभिनेत्री मृणाल दुसानिसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात एका ठिकाणी इंटेरियर डिझाइनचं काम सुरु होतं. त्यावरुन चाहत्यांनी अनेक अंदाज बांधले होते. मृणाल नवीन व्यवसाय सुरु करणार असल्याने अनेकांनी म्हटले होते. परंतु ती नक्की काय करणार आहे याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर तिने आता स्वतः चे रेस्टॉरंट सुरु केले आहे.

मृणाल आणि तिचा नवरा नीरज मोरे यांनी ठाण्यात नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. मृणालने या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने रेस्टॉरंट सुरु व्हायचा आधीपासून ते आता रेस्टॉरंट कसं आहे हा पूर्ण प्रवास शेअर केला आहे. मृणालच्या या नवीन रेस्टॉरंटचं नाव बेली लाफ्स (Belly Laughs) असं आहे. (Mrunal Dusanis New Venture)

मृणालने काल १७ नोव्हेंबर रोजी हे नवीन रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुलं केलं आहे. तिच्या या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्ञानदा रामतिर्थकर,शर्मिष्ठा राऊत, विदुला या कलाकारांनी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT