Mitali Mayekar Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mitali Mayekar Trolled: बालीमध्ये मिताली मयेकरचे बिकिनी फोटोशूट, ट्रोलर्स म्हणाले - 'बाद झाली लका तू पण'

Priya More

Marathi Actress Mitali Mayekar:

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सोशल मीडियावर (Social Media) खूपच सक्रीय असते. मिताली मयेकर सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पती सिद्धार्थ चांदेकरसोबत दुबईला गेला होती. याठिकाणी त्यांनी खूपच धम्माल केली होती. त्याचे फोटो देखील दोघांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते.

दुबईवरून आल्यानंतर मिताली आता बालीमध्ये सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मितालीने सोशल मीडियावर बालीमध्ये इन्जॉय करतानाचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून मितालीला ट्रोल केले जात आहे. हे फोटो पाहून संतप्त होत नेटिझन्सनी मितालीला मराठी संस्कृतीचे धडे दिले आहेत.

मितालीला भटकंटीची प्रचंड आवड आहे. ती नेहमी जगभरातील देशांमध्ये फिरत असते. मिताली सध्या बालीमध्ये सुट्ट्या इन्जॉय करत आहे. बालीमध्ये मितालीचा आतापर्यंतचा न पाहिलेला सर्वात हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. मितालीने बिकिनी घातली असून समुद्रात सर्फिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. मितालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सर्फबोर्ड हातामध्ये घेऊन पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती समुद्रात मस्ती करताना दिसत आहे. मितालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'सनसेट सर्फिंग' असे लिहिले आहे.

मितालीच्या चाहत्यांनी हे फोटो पाहून तिच्या हॉटनेस आणि सौंदर्याचे कौतुक केले. तर दुसरीकडे नेटिझन्सनी ट्रोल करत तिला मराठी संस्कृतीचे धडे शिकवले आहेत. मितालीच्या या पोस्टवर कमेट्स करत तिला ट्रोल करण्यात आले आहेत. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये 'वाटोळे करा मराठी संस्कृतीचे' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट्स करत 'आवश्यकता नाहीये. दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीमधील कोणत्या मॉडेल, अभिनेत्री कलाकार अशा गोष्टींना बळी नाही पडत!', असे लिहिले आहे. तर, आणखी एका युजरने 'मराठी संस्कृतीमध्येच चांगलं दिसतं. पण हे नाही', अशी कमेंट करत मितालीला सल्ला दिला आहे.

ऐवढंच नाही तर मितालीच्या या पोस्टवर आणखी कमेंटस आल्या आहेत. यामध्ये 'बाद झाली लका तू पण', 'मराठी कलाकार खुप मोठे मोठे होऊन गेले ...पण हिच्या सारखं कोणी केलं नाही.', 'जरा सुधरा', अशा प्रकारच्या कमेंट्स करत तिला मराठी संस्कृतीचे धडे दिले आहेत. तर दुसरीकडे मितालीच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट देखील केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'तुला स्वातंत्र्य आहे, कोणते कपडे घालायचे आणि कोणते नाही हे तूच ठरव. बाकीच्यांना काय बोलायचे ते बोलू दे. तू तुझं सुरू ठेव.' मिताली मयेकरच्या या पोस्टला ३८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT