Meera Joshi Wedding Date Instagram @meerajoshi_
मनोरंजन बातम्या

Meera Joshi Wedding Date: तारीख लक्षात आहे ना? मराठमोळी अभिनेत्री या दिवशी अडकणार लग्नबंधनात; होणाऱ्या पतीची करून दिली ओळख

Meera Joshi Post: मीरा जोशीने तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या फोटो शेअर करून तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

Pooja Dange

Marathi Actress Meera Joshi Wedding Date:

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील मीरा तुम्हाला आठवतेय का? या मालिकेत तिने नकारात्मक पात्र साकारलं होत. अजूनही ते प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही मीरा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

काही दिवसांपूर्वी मीरा जोशीने तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या फोटो शेअर करून तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता तिने लवकर लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे.

मीरा जोशीने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. समुद्रकिनाऱ्यावरील या फोटोमध्ये मीरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती. परंतु या फोटोमध्ये त्याचा चेहरा मात्र तिने दाखविला नव्हता. यामुळे तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिच्या पार्टनरविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.

मीराने काही तासांपूर्वी पुन्हा त्या आऊफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बॉयफ्रेंडच्या चेहरा आणि लग्नाची तारीख रिव्हील केली आहे. येत्या ५ तारखेला म्हणजे ५ सप्टेंबरला मीरा जोशी लग्न करणार आहे.

मीरा जोशीचा या फोटोंमधील लूक खूपच पारंपरिक आहे. मीराने परकर-पोलकं घातलं आहे आणि त्यावर दोन वेण्या बांधल्या आहेत.

मीराच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव नेहूल वारुळे आहे. नेहूल अभिनेता आणि नृत्यदिग्दर्शक आहे. टीव्हीवरील अनेक शोसाठी त्याने नृत्यदिगदर्शन केले आहे.

मीरा आणि नेहूल दोघेही डान्सर आहे. अनेक रिऍलिटी शोमध्ये ते सहभागी झाले आहेत. मीरा मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: राज्य सरकारचा निर्णय मोठा, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

SCROLL FOR NEXT