Sajid Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sajid Khan: 'साजिद खानने ऑफिसला बोलवलं आणि...' मराठी अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड हिने साजिद खानवर आरोप केला आहे.

Pooja Dange

Marathi Actress Accuses Sajid Khan: कॉमेडी चित्रपट बनविणारा बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान सध्या बिग बॉस 16चा स्पर्धक आहे. साजिद बिग बॉसमध्ये गेल्यापासूनच त्याच्या या शोमध्ये असण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. साजिदवर #MeToo सारखे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

अभिनतेरी शर्लिन चोप्राने #MeToo अंतर्गत साजिद खानावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ शोमधून बाहेर काढण्याची मागणी देखील केली होती. तसेच शर्लिनसह अनेक अभिनेत्रींनी साजिद आरोप केले आहेत तसेच सलमान खानवर देखील प्रश्न उपस्थित केले आहे. आता यात आणखी एका अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. (Allegation)

मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड हिने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीला नेले होते. तिथे माझी साजिद खानशी ओळख झाली. साजिद खानला भेटून मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साजिद खानने मला त्याच्या कार्यालयात बोलावले. तो म्हणाला की तो एक चित्रपट बनवत आहे आणि कदाचित त्यात माझी भूमिका असेल. मी त्यांच्या कार्यालयात जाताच त्यांनी मला इकडे-तिकडे स्पर्श करून अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली.

साजिद खान मला म्हणाला की तू खूप सुंदर आहेस पण मी तुला काम का देऊ? मग मी त्याला म्हणालो कि सर तुम्हाला काय हवे आहे. मी चांगला अभिनय करू शकतो. मग तो म्हणाला की अभिनय चालत नाही. मी जे सांगेन, ते तुला करावं लागेल. मला खूप राग आला. त्यावेळी मला वाटले की त्याला मारावे. मग मी तिथून बाहेर आले.

साजिद खानवर त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्राने देखील आरोप केले होते. याशिवाय पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनीही त्यांच्यावर अश्लील आणि असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी यांचाही पीडितांच्या यादीत समावेश आहे. सर्वांनी त्यांच्या वतीने चित्रपट निर्मात्याच्या विरोधात पुरावेही सादर केले होते. त्यानंतर त्याच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. आता तो थेट बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT