Kanni Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanni Trailer: तुमचं मन आणि हृदय जिंकणाऱ्या 'कन्नी'चा ट्रेलर आऊट, मैत्री आणि प्रेमाचा अर्थ लवकरच समजावणार

Priya More

Kanni Movie:

'मन उडू उडू झालंय' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचली अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या आगामी 'कन्नी' चित्रपटामध्ये (Kanni Movie) चर्चेत आहे. 'मन उडू उडू झालंय' या मालिकेमध्ये हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. आता ही जोडी 'कन्नी' चित्रपटाच्या (Kanni Movie) माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या हृता आणि अजिंक्य कन्नी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोघांचेही चाहते या चित्रपटाच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

मैत्री, प्रेम आणि स्वप्न यावर आधारित कन्नी चित्रपट आहे. कन्नीच्या माध्यमातून मैत्री आणि प्रेमाचा अर्थ लवकरच समजावणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हृता दुर्गुळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. कन्नीचा ट्रेलर शेअर करत हृताने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दोस्तीची, प्रेमाची कन्नीसोबत असल्यावर जगातली सगळी युद्धं अगदी सहज जिंकता येतात.. घेऊन आलो आहोत, तुमचं मन आणि हृदय जिंकणारा 'कन्नी'चा हा स्पेशल ट्रेलर...'कन्नी' ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत!' हृता दुर्गुळेच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

कन्नी चित्रपटामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतसोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हे सर्वजण मित्र दाखवण्यात आले आहेत. हृताला परदेशामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न असते. या स्वप्नात तिला तिचे जवळचे मित्र किती कन्नी बांधतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. नुकताच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत आहे. या चित्रपटामध्ये हे सर्व मित्र हृताला कशी मदत करतात हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.

समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी'बाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तर अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT