Hemangi Kavi
Hemangi Kavi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi: हेमांगी कवी फॅन्सवर भडकली; म्हणाली, माझे नाव...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: हेमांगी कवी (Hemangi Kavi) बऱ्याचदा सोशल मीडियावर वादाच्या भोवऱ्यात पडणाऱ्या पोस्ट टाकत असते. (Marathi Actress) तिच्या रोखठोक आणि बिनधास्त विधानांमुळे आणि मतांमुळे अनेकदा चर्चेत असते. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा तिच्या पोस्ट्सवरुन नेटकरी तिला ट्रोलही करत असतात. आता पुन्हा एकदा हेमांगी चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्याने एका पोस्टवर तिचे चुकीचे नाव घेतल्यामुळे पोस्ट चर्चेत आली आहे. (Marathi Entertainment News)

हेमांगी फेसबूकच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतेच हेमांगीने वेगवेगळ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोला मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या खास ओळी लिहित फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तिने मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहे. “शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी, दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी, वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा, तू असा जवळी रहा – मंगेश पाडगावकर”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Hemangi Kavi Post

या पोस्टवर कमेंट करताना चाहत्याने लिहिले की, 'अप्रतिम शुभांगी' त्यावर हेमांगी बोलते, म्हणजे नावसमोर असतानाही कसं काय चुकू शकत? मात्र चाहत्याने तिचे नाव चुकीचे लिहिले म्हणून ती त्याच्यावर चांगलीच भडकली आहे. चुकीचे नाव घेतलेल्या चाहत्याला बरेच जणांनी तिचे हेमांगी नाव आहे असेही सांगितले आहे. दरम्यान हेमांगीची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Mulund BJP | बघतोच आता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना थेट इशारा

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

Gallstones News : पित्ताशयातील खडे कसे बरे होतात? वाचा डॉक्टरांनी सांगितलेले समज आणि गैरसमज

Special Report : छगन भुजबळ नाराज! महायुतीला टेंशन वाढवणार?

SCROLL FOR NEXT