dnyanada ramtirthkar wedding photos Saam tv
मनोरंजन बातम्या

Dnyanada Ramtirthkar: 'माझं पूर्ण नावं नीट ऐका...'; अभिनेत्री ज्ञानदा अडकली लग्नबंधनात, खास उखाणा घेत सांगितली सगळी लव्हस्टोरी

Dnyanada Ramtirthkar: मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने हर्षद गायकवाडसोबत लग्नगाठ बांधली. तिचा १८ ओळींचा उखाणा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Dnyanada Ramtirthkar: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने अखेर तिचा प्रियकर आणि सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाडसोबत काल लग्नगाठ बांधली आहे. पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह कलाकार मंडळींकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्ञानदाने लग्नासाठी खास पारंपरिक वाईन कलरची नऊवारी साडी परिधान केली होती. हिरव्या बांगड्या, नथ आणि दागिन्यांमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. विशेष म्हणजे तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

ज्ञानदा उखाणा घेत म्हणाली, 'एका शॉर्टफिल्मच्या शूटला भेटलो होतो आम्ही, तेव्हा अजिबात माहित नव्हतं हेच होणारेत माझे स्वामी...त्याने हातात धरलेला कॅमेरा, मी केलेली अभिनयाची निवड, कामात पुरते गुंतून गेलो एकमेकांना भेटायला नव्हती सवड...फोन, व्हॉट्सअॅप, व्हिडीओ कॉल्सने सोपं केलं जगणं, आता तुझ्या पॅकअपनंतरचा वेळ हेच होतं दोघांचंही मागणं...काम करत राहिलो, एकमेकांना समजून घेतलं...कसं कधी कळलंच नाही पण हे लाँग डिस्टन्स प्रेम फुलत गेलं, तो होता पुण्यात मी होते मुंबई मग आठवण यायला लागली...त्या आठवणीतच बहुतेक प्रेमाची गाठ अजून घट्ट झाली...सतत सांगत राहिलो एकमेकांना कामावर फोकस कर...योग्य वेळ आल्यावर होणारच आहोत आपण एकमेकांचे वधूवर...आता कळतंय त्यावेळी एकमेकांना केलेला सपोर्टच महत्वाचा होता, डोळे भरुन येतात ते सगळं मागे वळून बघताना...आता त्याच्या कॅमेरा, लेन्स, लाईट्स आणि फोकसला मी सुद्धा समजून घेतलंय...माझ्या आयुष्यातल्या अभिनयाच्या रसांना त्यानेही आपलंसं केलंय...आज लग्न झालंय आमचं इथून पुढे आमच्या प्रेमात होत राहील सदैव वाढ...हर्षद रावांचं नाव घेते माझं पूर्ण नाव नीट ऐका ज्ञानदा हर्षद गायकवाड.'

ज्ञानदाने आपल्या नवऱ्यासाठी तब्बल १८ ओळींचा खास उखाणा घेतला. त्यामध्ये त्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपपासून प्रेमाच्या प्रवासापर्यंत अनेक भावना व्यक्त केल्या. तिचा हा उखाणा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे. यासह ज्ञानदाने लग्नाआधीच्या मेहंदी, केळवण आणि इतर कार्यक्रमांचे फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sayali Sanjeev: साजिरं रुप तुझं दडलं मनात ग...

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमन पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT