Akshaya Deodhar Saam tv
मनोरंजन बातम्या

Akshaya Deodhar Good News: पाठकबाईंची चाहत्यांना गुडन्यूज! आता 'या' माध्यमांतून करणार लोकांचं मनोरंजन

Akshaya Deodhar News: अक्षयाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Vishal Gangurde

Akshaya Deodhar News: अत्रिनेत्री अक्षया देवधर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. अक्षया सोशल मीडियावर सक्रिय असते. अक्षया 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पाठकबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात घराघरात पोहोचली. याच अक्षयाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Latest Marathi News)

अभिनेत्री अक्षया आणि हार्दिक जोशी या जोडीने मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघांनी काही महिन्यापूर्वीच लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघे नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनाला गेले होते.

दोघांनी मनोरंजनसृष्टीत मोठा चांगलाच जम बसवला आहे. अशातच अक्षयाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अक्षयाने इन्टा स्टोरी पोस्ट करून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अक्षयाने चाहत्यांना नवा युट्युब चॅनल काढल्याची माहिती दिली आहे. अक्षयाने तिचा युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

अक्षयाच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'अक्षया तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओत अक्षयाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच अक्षया पारंपरिकरित्या वडाची पूजा करताना दिसत आहे.

Akshaya Deodhar

अक्षयाच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट्स करताना म्हटले आहे की, 'अक्षया अखेर तुझा युट्युब चॅनल आला. आता रोज व्लॉग शेअर करत राहा'.तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की,'अक्षया तुझं अभिनंदन! तुझा युट्युब चॅनल पाहून छान वाटतंय'.

दरम्यान, अक्षयाचाा युट्युब चॅनल पाहून तिचे चाहते खूपच खूश असल्याचे दिसून येत आहे. अक्षयाच्या नव्या युट्युब चॅनलवर आता चाहत्यांना नव्या मनोरंजनाची मेजवाणी मिळणार आहे.

अक्षयाच्या नव्या युट्युब चॅनलला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, अक्षयाने इन्स्टा स्टोरी शेअर केल्यानंतर युट्युब चॅनेलची लिंक दिली आहे. तसेच चाहत्यांना आपलं चॅनेल सबस्क्राइब करायची विनंती देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT