Navra Maza Navsacha 2 Movie Shooting Starts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navara Maza Navasacha 2: चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’च्या शूटिंगसाठी स्वप्निल जोशी रेल्वेने कोकणात रवाना

Priya More

Navra Maza Navsacha 2 Movie:

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तब्बल १९ वर्षानंतर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा सुपरहिट चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा'चा सिक्वेल येत आहे त्यामुळे प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबाबत एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटाची टीम शूटिंगसाठी कोकणात रवाना झाली आहे. स्वप्निल जोशीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत ही माहिती दिली.

स्वप्निल जोशीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्वप्निल जोशीसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर दिसत आहे. ‘नवरा माझा नवसाचा २'च्या शूटिंगसाठी स्वप्निल जोशी चित्रपटाच्या टीमसोबत कोकणात रवाना झाला आहे. हे सर्वजण कोकणामध्ये विमानाने किंवा कारने गेले नाही. तर त्यांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केलं आहे. कोकण रेल्वेने हे सर्वजण कोकणात गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग कोकणामध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वप्निल जोशीने कोकण रेल्वेचे फोटो शेअर करत रेल्वेने नाही तर विमानाने प्रवास करत असल्यासारखे वाटत असल्याचे लिहिले आहे. स्वप्निल जोशीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मिती सचिन पिळगावकर करणार आहेत. त्याचसोबत ते या चित्रपटामध्ये अभिनय देखील करणार आहे. हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता.

‘नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, जयवंत वाडकर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT