Taali Webseries Saam TV
मनोरंजन बातम्या

Taali Webseries: 'ताली'मध्ये तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळा अभिनेता, पोस्टर बघूनही ओळखताच येणार नाही

Marathi Actors In Taali Webseries : वेबसीरीजमध्ये अनेक मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील एका मराठी कलाकाराची भूमिका आता समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suvrat Joshi In Taali WebSeries

रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीजची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'ताली' वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरीजमध्ये अनेक मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील एका मराठी कलाकाराची भूमिका आता समोर आली आहे.

रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीज खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपट ट्रान्सजेंडर आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सांवतच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात सुष्मिता सेन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, वेबसीरीजमध्ये अनेक मराठी कलाकार दिसणार आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता सुव्रत जोशी या वेबसीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. वेबसीरीजचा एक फोटो सध्या समोर आला आहे. वेबसीरीजमध्ये सुव्रत जोशी एका ट्रान्सजेंडर भूमिकेत दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'ताली' या वेबसीरीजविषयी सुव्रत जोशी सोशल मीडियावर पोस्ट करत होता. परंतु तो कोणती भूमिका साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु नुकतंच चित्रपटाचे एक पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये सुव्रत जोशी सुष्मिता सेनच्या बाजूला बसलेला दिसत आहे.

ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत असलेल्या सुव्रतने लाल आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सुव्रतने काही दिवसांपूर्वी ताली वेबसीरीजसाठी एक पोस्ट केली होती.

या पोस्टमध्ये सुव्रतने ताली वेबसीरीजचा ट्रेलर पोस्ट केला आहे. 'श्री गौरी सावंत यांच्यासारख्या आधुनिक भारतातील अत्यंत महत्त्वाच्या मराठी व्यक्तीवर बेतलेल्या कामाचा भाग असण्याचा आनंद आणि अभिमान!' असे कॅप्शन दिले आहे. ताली चित्रपट १५ ऑगस्टला 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सुव्रत जोशीसोबत कृतिका देव, ऐश्वर्या नारकर हे मराठमोळे कलाकार झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT