Siddharth Jadhav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav:...म्हणून सिद्धार्थ जाधव इंडिगो एअरलाइन्सवर संतापला, VIDEO शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं?

Siddharth Jadhav Angry On Indigo Airline: सिद्धार्थला या प्रवासादरम्यान आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत शेअर केला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव इंडगो एअरलाइन्सवर चांगलाच संतापलेला दिसला.

Priya More

Siddharth Jadhav Video:

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या चर्चेत आला आहे. सिद्धार्थ जाधवने फक्त मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील तो काम करतो. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळवून हसवत तो सर्वांचे मनोरंजन करतो. कामानिमित्त सिद्धार्थ जाधव नेहमीच विमानाने प्रवास करतो. पण यावेळी विमानाने गोव्याला प्रवास करणे सिद्धार्थला चांगलेच महागत पडले आहे. सिद्धार्थला या प्रवासादरम्यान आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत शेअर केला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधव इंडगो एअरलाइन्सवर चांगलाच संतापलेला दिसला.

सिद्धार्थ जाधवने काही कामानिमित्त नुकताच मुंबई ते गोवा असा प्रवास केला. त्याने नामांकित इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने हा प्रवास केला. या प्रवासादरम्यान जेव्हा सिद्धार्थ गोव्याला पोहचला तेव्हा त्याने त्याच्या बॅगेची जी अवस्था पाहिली त्यामुळे तो चांगलाच संतापला. सिद्धार्थ जाधवने कॅरी केलेली बॅग अक्षरश: फुटली होती. सिद्धार्थने आपल्या लगेजची जी अवस्था झाली ती व्हिडीओ शेअर करत सर्वांसोबत शेअर केली. यावेळी सिद्धार्थने इंडिगो एअरलाइन्सवर चांगलाच राग व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने इंडिगो एअरलाइन्सच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ सांगतो की, 'हाय, नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. मी आता मुंबईहून गोव्याला आलोय इंडिगो फ्लाइटनं. त्यांनी बघा किती छान पद्धतीने माझं जे लगेज आहे त्याचं हँडल विथ केअर केली आहे. जवळजवळ माझ्या बॅगेचं फक्त हँडलच ठेवलं आहे बाकी केअर बघा. संपूर्ण माझी बॅग बघा. खूप छान वाटलं इंडिगोवाले मला. खरंच खूप छान वाटलं तुम्ही ज्यापद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. बाकी माझं काय म्हणणं नाही. पण हे खूप छान आहे.'

सिद्धार्थ जाधवने व्हिडीओमध्ये दाखवलेली त्याची ट्रॉली बॅग पूर्णपणे फुटलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इंडिगोला माझ्या बॅगीची चांगली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे. सिद्धार्थने हा व्हिडीओ शेअर करत विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्सला देखील टॅग केले आहे. सिद्धार्थ जाधवच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. सिद्धार्थ जाधवचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT