Gandhi Talks Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gandhi Talks Teaser: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची साऊथमध्ये एन्ट्री; विजय सेतूपतीसह 'या' सिनेमात दिसणार महत्वाच्या भुमिकेत

साऊथ स्टारसह मराठमोळा अभिनेता साकारणार एक मुकपट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलीवूडनंतर (Bollywood)सध्या चर्चा असते ती साऊथच्या चित्रपट आणि कलाकारांची. सुपरस्टार शाहरुखानच्या 'जवान' चित्रपट दिसणार असल्याने साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती हा चर्चेत होता. त्यानंतर काही दिवसातच विजय सेतूपतीच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विजयच्या ‘गांधी टॉक्स’या नव्या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विजयच्या या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच परंतु त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत देखील आपली ओळख निर्माण केली आहे. मराठी सृष्टीतील दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त त्याने बॉलीवूडमधील अनेक मोठ्या स्टार सोबत काम केले आहे. मराठी, हिंदी नंतर त्याने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला आहे. सिद्धार्थ आता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक मुकपट आहे. हा चित्रपट पैशांच्या खेळावर आधारित असल्याचे या चित्रपटाच्या टीझरवरून दिसून येत आहे.

सिद्धार्थ जाधव याने त्याच्या सोशल मीडिया पोस्ट द्वारे 'गांधी टॉक्स' या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं आहे की, , “मी फार उत्सूक आहे… माझा पुढील चित्रपट. पुन्हा एकदा मुकपटांचा काळ जगूया. झी स्टुडिओज अभिमानाने सादर करत आहे ‘गांधी टॉक्स’. विजय सेतूपती, अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव स्टारर डार्क कॉमेडी आणि ए. आर. रहमान म्युझिकल.”

'गांधी टॉक्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेलेकर यांनी केले आहे. विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मुव्ही मिल एंटरटेनमेंट हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT