Shreyas Talpade's First video After Heart Attack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade: हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदे पहिल्यांदाच समोर; पाहा व्हिडिओ

Shreyas Talpade After Heart Attack: बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 'वेलकम 3'च्या शूटिंगनंतर हृदयविकाराचा झटका आला होता. यातून तो आता पूर्णपणे बरा झाला असून या घटनेनंतर तो पहिल्यांदाच कॅमेरा समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shreyas Talpade's First video After Heart Attack

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 'वेलकम 3'च्या शूटिंगनंतर हृदयविकाराचा झटका आला होता. यातून तो आता पूर्णपणे बरा झाला असून या घटनेनंतर तो पहिल्यांदाच कॅमेरा समोर आला आहे. त्याने इंस्टाग्राम लाईव्ह येत चात्यांचे आभार मनात मनात म्हणाला की, ''माझ्यासोबत जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तुम्ही (चाहते) ज्याप्रकारे मला प्रेम दिलं, माझ्यासाठी उभे राहिलात, माझ्यासाठी प्रार्थना केल्या. त्यासाठी तुमचे आभार.'' (latest News)

'तुम्ही मंदिरात, मश्चिद, चर्चमध्ये जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केल्या हे मी कधीच विसरणार नाही. त्यासाठी त्यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या वाईट काळात चाहत्यांनी आणि माझ्या कुटुंबियांनी खास माझ्या बायकोने माझी खूप काळजी घेतली. त्यासाठी मी खूप आभारी आहे', या शब्दात त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे.

श्रेयस तळपदेने इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये अजून एक गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका खूप गाजली होती. त्यानंतर मालिकेचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता हे दोघे लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे.

Shreyas Talpade Instagram Live For New Movie Announcement With Prarthana Behere

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे दोघांनी इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये ही माहिती चाहत्यांना दिली आहे.' माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एका गुड न्यूज आहे. आम्ही लवकरच एकत्र काम करणार आहोत. आज आम्ही चित्रपटाच्या कथानकासाठी एकत्र आलो आहोत. लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येऊ', असं श्रेयस तळपदेने सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT