Shalva kinjawadekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shalva kinjawadekar : 'शिवा' फेम शाल्व अन् श्रेयाचे सूर जुळले, केळवणाला सुरूवात, पाहा PHOTO

Shalva-Shreya Kelvan : 'शिवा' फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर लवकरच आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याने आपल्या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

Shreya Maskar

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहे. अनेक कलाकरांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. आता 'शिवा' (Shiva) या लोकप्रिय मालिकेचा अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva kinjawadekar) गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत (Shreya Daflapurkar) लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे.

शाल्वने आपल्या इंस्टाग्रामवर केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. या फोटोमध्ये दोघही खूपच सुंदर दिसत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहायला मिळत आहेत. केळवणासाठी (Shalva-Shreya Kelvan) शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला तर श्रेयाने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. शाल्व आणि श्रेयाच्या केळवणाच्या फोटोंवर चाहत्यांनी आणि कलाकरांनी भरभरून कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत.

2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शाल्व आणि श्रेयाने आपल्या साखरपुडा केला होता. हे खूप क्यूट कपल आहे. शाल्वला खऱ्या अर्थाने 'येऊ तशी कशी मी नांदायला' या मालिकेतून भरपूर लोकप्रियता मिळाली. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता 'शिवा' या मालिकेत शाल्व किंजवडेकर अभिनेत्री पूर्वा कौशिकसोबत स्क्रीन शेअर करत आहे. श्रेया ही फॅशन डिझायनर आहे. शाल्वचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आता शाल्वच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT