Navara Maza Navasacha 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २’, तुमच्या आवडते कलाकार मुख्य भूमिकेत; निर्मात्यांनी जाहीर केली नावं

Priya More

Navara Maza Navasacha 2:

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी नुकताच त्यांचा आगामी चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली. तब्बल १९ वर्षानंतर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा सुपरहिट चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा' सिक्वेल येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला. पण या चित्रपटामध्ये नेमके कोण-कोण कलाकार दिसणार असा प्रश्न त्यांना पडला होता. अशामध्ये आता या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी आज सोशल मीडियावर या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करत स्टारकास्टची यादी जाहीर केली आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत स्टारकास्टची नावं जाहीर केली आहे. या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, जयवंत वाडकर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, '१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २’ गणपती बाप्पा मोरया!' या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे. सचिन पिळगावकर यांनी २००४ मध्ये 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'नवरा माझा नवसाचा २' (Navara Maza Navsacha 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत.

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या पार्ट २ मध्ये यामधील अनेक कलाकार नसणार आहेत. तर काही नवीन कलाकारांची एन्ट्री या चित्रपटामध्ये झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT