Pravin Tarde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde : 'ही देवाची देण...' प्रवीण तरडेने केलं 'फुलवंती'चं कौतुक, म्हणाला...

Prajakta Mali : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र 'फुलवंती' ची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता प्राजक्ता माळीने एक खास किस्सा सांगितला आहे.

Shreya Maskar

सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या 'फुलवंती' (Phullwanti) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरपूर प्रेम करत आहेत. या चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

प्राजक्ताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओत पाहू शकता की, प्राजक्ता माळीला विचारण्यात आले की, "या संपूर्ण प्रवासात तुला मिळालेली सेटवर सर्वात चांगली कॉम्प्लिमेंट कोणती?" यावर प्राजक्ताने सांगितले की, "मला बेस्ट कॉम्प्लिमेंट प्रवीण सरांकडून मिळाली. आम्ही बॅक टू बॅक सलग सहा दिवस डान्स शूट करत होतो. तेव्हा साधारण चौथ्या-पाचव्या दिवशी प्रवीण सर म्हणाले की, तू जे नाचतेयंस ते दैवी आहे. सलग काही दिवस डान्स सीक्वेन्स शूट करताना एक एवढी ऍनर्जी राखून ठेवणे म्हणजे ही खरंच देवाची देण आहे"

प्राजक्ता पुढे म्हणाली की,"'फुलवंती' हे तिचे आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात आवडते पात्र आहे. मी एक नर्तिका आहे आणि हे पात्र देखील एका नर्तिकेचे आहे. फुलवंती हे माझं स्वप्न होतं."

प्रवीण तरडे यांनी 'फुलवंती'चे संवाद लेखन केले आहे. तर 'फुलवंती' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी सांभाळली. या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकारही पाहायला मिळत आहेत. 'फुलवंती' हा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत गश्मीर महाजनी देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT