Prathamesh Parab Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab: साखरपुड्यानंतर सासरवाडीला पोहचला प्रथमेश परब, घोसाळकर कुटुंबीयांनी असं केलं स्वागत; PHOTO व्हायरल

Priya More

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar:

२०२४ या हे वर्ष मराठी सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरत आहे. नुकताच शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) विवाहबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री पूजा सावंत- सिद्धेश चव्हाण आणि अभिनेता प्रथमेश परब- क्षितीजा घोसाळकर हे देखील लग्न करणार आहेत. सध्या या कपलच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. प्रथमेश परबने (Prathamesh Parab) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) साखरपुडा केला. आता लवकरच हे कपल लग्न देखील करणार आहेत. साखरपुडा झाल्यानंतर प्रथमेश परब त्याच्या सासरवाडीला म्हणजेच श्रीवर्धनला गेला आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबने १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी धुमधडाक्यात साखरपुडा केला. हे कपल साखरपुड्यामध्ये खूपच क्युट दिसत होते. प्रथमेश-क्षितीजाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. हे कपल येत्या २४ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकतील. नेरुळमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मित्र परिवार आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अशामध्ये प्रथमेश परब कोकणातील आपल्या सासरवाडीला म्हणजे क्षितीजा घोसाळकरच्या गावी गेला आहे. श्रीवर्धनला प्रथमेशचे म्हणजेच जावयाचे जबरदस्त स्वागत करण्यात आले. क्षितीजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये दिसत आहे की, क्षितीजाच्या घरी सुंदर रांगोळी काढत प्रथमेशचे स्वागत करण्यात आले. या रांगोळीमध्ये 'वेलकम टू सासुरवाडी' असे लिहिण्यात आले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये क्षितीजाच्या गावच्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ प्रथमेश आणि ती बसलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करत क्षितीजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जावई @सासुरवाडी'

दरम्यान, प्रथमेश परब गेल्या काही वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते. महत्वाचे म्हणजे ती प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियरला आवर्जून उपस्थिती लावते. ती प्रथमेशला त्याच्या प्रत्येक कामात मदत करते. प्रथमेश आणि क्षीतिजा हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. प्रथमेशला रिअल लाइफमध्ये प्राजू भेटल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT