Prasad Oak saam tv
मनोरंजन बातम्या

Prasad Oak : प्रसाद ओकची गगन भरारी; अभिनेत्याच्या नावावर 2 विश्वविक्रमांची नोंद, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Prasad Oak - Dharmveer Movie : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्याच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. त्याने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Shreya Maskar

प्रसाद ओकने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

प्रसाद ओकच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.

प्रसाद ओकला 'धर्मवीर' चित्रपटासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसाद ओकचे चाहते खूपच खुश आहेत. प्रसादने खूप मोठे यश मिळवले आहे. प्रसाद ओकचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपट 2022 ला रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच चित्रपटाने चांगले कलेक्शन देखील केले. 'धर्मवीर' चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या चिपटात प्रसाद ओक याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे आजही खूप कौतुक होते.

प्रसाद ओकने त्याला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सांगितल्याप्रमाणे, 'धर्मवीर' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळाले. 'धर्मवीर' चित्रपटाला एकाच सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'ग्लोबल बुक ऑफ Excellence इंग्लंड रेकॉर्ड' या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. प्रसाद ओकला एकाच चित्रपटासाठी एका वर्षात तब्बल 15 पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे दोन विश्वविक्रमांची त्याच्या नावावर नोंद झालेली आहे.

'धर्मवीर' चित्रपटामुळे प्रसाद ओकचे नशीब चमकले आहे. मिळालेल्या यशामुळे प्रसाद ओकने 'धर्मवीर' च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 'धर्मवीर' चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत. प्रसाद ओकने मिळवलेल्या या यशामुळे सध्या सर्वत्र त्याचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चाहते, मित्रमंडळी आणि कलाकार त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहे. त्याला शुभेच्छा देत आहे. कौतुक करत आहेत.

व्हिडीओमध्ये प्रसाद ओकसोबत त्याची बायको मंजिरी ओक पाहायला मिळाली. आता चाहते प्रसाद ओकच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रसादच्या व्हिडीओवर अमृता खानविलकरने "तुझा खूप अभिमान आहे..." तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने "प्रसाद दा, मनापासून अभिनंदन..." अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT