Marathi Actor Jaywant Wadkar Instagram Account Hacked Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Instagram Hacked: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं अकाऊंट हॅक; आठवड्याभरात चाहत्यांची आर्थिक फसवणूक, नेमकं काय घडलं?

Actor Instagram Hacked: अभिनेते यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याने गुंतवणुकीच्या फसव्या पोस्ट्स व्हायरल होत आहे. चाहत्यांमध्ये गोंधळ; सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करून तपास सुरू.

Shruti Vilas Kadam

Actor Instagram Hacked: काही काळापासून मराठी कलाकारांसोबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून फ्रॉडचे प्रकरा घडत आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांच्याबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटचा गैरवापर करत  बिटकॉइन आणि ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या पोस्ट्स टाकल्या. “अल्पावधीत मोठा नफा मिळवा” किंवा “माझ्या कोचशी संपर्क साधा” अशा प्रकारच्या संदेशांमुळे अनेक चाहत्यांनी या पोस्ट्सवर विश्वास ठेवला. त्यामुळे काही वेळासाठी संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं.

आठवड्याभराने एका परिचिताकडून हा प्रकार लक्षात येताच वाडकर यांच्या टीमने तत्काळ यावर प्रतिक्रिया दिली आणि हे अकाऊंट हॅक झाल्याचं स्पष्ट केलं. तसेच, चाहत्यांनी अशा कोणत्याही पोस्ट्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले. सोशल मीडियावर वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे अशा घटना वारंवार समोर येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, हॅकर्सचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासात हॅकर्सनी त्यांच्या ई-मेल आयडीमध्ये फेरफार करून अकाऊंटवर ताबा मिळवल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळेच त्यांच्या सोशल मीडियाचा एक्सेस हॅकर्सना मिळाला. जयवंत वाडकरांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे मराठी विश्वासह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT