Onkar Bhojane Viral Video Insatgram/ @onkar_bhojane_
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojane Viral Video: ओंकारने भर नाटकात काढली प्रेयसीची आठवण; ‘तू दूर का…’ म्हणत झाला भावूक

सध्या ओंकारचा ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Onkar Bhojane Viral Video: ओंकार भोजने नेहमीच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी ओंकार भोजनेने आपली ओळख निर्माण केली. अभिनय आणि कॉमेडीमधून प्रसिद्धी मिळवलेला ओंकार सध्या त्याच्या चाहत्यांना नाटकातून सुद्धा भेटीला येत आहे. सध्या ओंकार ‘करुन गेलो गाव’या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या नाटकाच्या शो मधीलच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

ओंकार त्याच्या नाटकामध्ये प्रेक्षकांना त्यानेच गायलेली एक कविता सादर करताना दिसला. ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे. ती कविता सर्वांच्याच मनात घर करून जाते. ‘तू दूर का…’ असे या कवितेचे बोल असून त्यानेच गायलेली कविता सादर करताना तो दिसला.

शेअर केलेल्या व्हिडीओतील ओंकार भोजनेच्या कवितेचे बोल

“तू दूर का…

अशी तू दूर का…

मी असा मजबूर का…

मनाला मनाची खरी ओढ राही

अलबेल सारे तरी गोड नाही

पाहण्या तुला मन हे आतुर का…

तू दूर का…

अशी तू दूर का…

मी असा मजबूर का…

मी असा मजबूर का…”

ओंकारला अभिनयासोबतच कॉमेडी आणि कविता बनवायची देखील त्याला फार आवड आहे. ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘फु बाई फु’ या कॉमेडी शो मधून त्याने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. सोबतच ‘बॉईज २’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT