Sneha Chavan Marriage SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sneha Chavan Marriage : अनिकेत विश्वासरावची एक्स बायको अडकली लग्नबंधनात, घरीच पार पडला सोहळा

Aniket Vishwasrao Ex Wife Marriage : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावची एक्स बायको पुन्हा लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) यांची एक्स बायको पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. स्नेहा चव्हाणच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्नेहाने मानससोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी घरीच साध्या पद्धतीने लग्न केलं आहे.

instagram

स्नेहा (Sneha Chavan) आणि मानस घरातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. या लग्न सोहळ्याला त्यांचे काही जवळचे मित्रमंडळी पाहायला मिळाले. तसेच त्यांचा रिसेप्शन सोहळा देखील पार पडला आहे.

स्नेहा आणि मानसचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडले. स्नेहाने लग्नासाठी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर मानसने शेरवानी परिधान केली आहे. दोघ एकत्र खूपच छान दिसत आहेत. यांचा रिसेप्शन सोहळा देखील पार पडला आहे. रिसेप्शनसाठी स्नेहाने स्टायलिश गाऊन परिधान केला आहे. तर मानसने ब्लॅक थ्रीपी सूट घातला आहे. या दोघांना अनेक कलाकर आणि चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत.

अभिनेत्री स्नेहा चव्हाण 2018 मध्ये अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्यादोन वर्षानंतरच ते विभक्त झाले. अनिकेत आणि स्नेहाचा संसार जास्त काळ टिकला नाही. स्नेहाने घटस्फोट घेताना घरगुती हिंसाचार केल्याचे आरोप अनिकेत आणि त्याच्या कुटुंबावर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT