Khurchi Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khurchi Trailer: हवा नाही वादळ येणार..., 'खुर्ची'चा धमाकेदार ट्रेलर; १२ जानेवारीला चित्रपट येतोय भेटीला

Khurchi Movie: अक्षय वाघमारे आणि राकेश बापट यांचा 'खुर्ची' हा चित्रपट (Khurchi Movie) १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर (Khurchi Trailer) रिलीज करण्यात आला आहे.

Priya More

Akshay Waghmare And Rakesh Bapat Movie:

2024 हे वर्ष सुरू झाले असून हे वर्ष देखील मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास असणार आहे. जानेवारी महिन्यात मराठी सिनेरसिकांना मनोरंजनाची मेजवाणी मिळणार आहे. येत्या ५ तारखेला 'ओले आले', 'सत्यशोधक' आणि 'पंचक' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापाठोपाठ आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे 'खुर्ची'. अक्षय वाघमारे आणि राकेश बापट यांचा 'खुर्ची' हा चित्रपट (Khurchi Movie) १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर (Khurchi Trailer) रिलीज करण्यात आला आहे.

'वादळ येणार! हवा नाही थेट वादळ येणार!' या संवादाप्रमाणे सत्तेचं वादळ सध्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण हे सत्तेचं वादळ रोमांचक खुर्चीचा खेळ खेळण्यास सज्ज होत आहे. 'खुर्ची' चित्रपटाच्या ट्रेलरने ही हवा आणखी वेगाने वाहू लागली आहे. नुकताच चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला.

२ मिनिटे २१ सेकंद असलेल्या या 'खुर्ची' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ राडा पाहायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये सत्तेसाठीची लढाई पाहता नेमकं कोण बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजे १२ जानेवारीलाच मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून ही उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट पाहून सत्तेसाठी लढल्या जाणाऱ्या लढाईतील विजेता कोण हे कळून येईल.

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहेत.

‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. १२ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT