Yaara Re Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanni Movie New Song: मैत्रीचा अर्थ समजून सांगणारे 'कन्नी'तील 'यारा रे' गाणं रिलीज

Yaara Re Song: कन्नी चित्रपटाच्या दमदार टीझर आणि ट्रेलरनंतर आता नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज या चित्रपटातील 'यारा रे' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

Priya More

Kanni Movie:

'मन उडू उडू झालंय' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचली अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या आगामी 'कन्नी' चित्रपटामुळे (Kanni Movie) चर्चेत आली आहे. 'मन उडू उडू झालंय' या मालिकेमध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांचे मन जिंकणारी हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यांची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून परत एकत्र दिसणार आहे. कन्नी चित्रपटाच्या दमदार टीझर आणि ट्रेलरनंतर आता नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज या चित्रपटातील 'यारा रे' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

काही दिवसांपूर्वीच 'कन्नी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील 'यारा रे' हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणं प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे. ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या गाण्याला जयदीप वैद्य यांनी जबरदस्त आवाज दिला आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत दिले आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक समीर जोशी यांनी या गाण्याबद्दल सांगितले की, 'यारा रे' या गाण्यात एक वेगळाच जोश आहे. हे गाणं रेकॉर्डिंग करताना आमच्यातही एक वेगळाच उत्साह होता. हे गाणं ऐकताना कुठेतरी आपणही आपल्या मैत्रीच्या दिवसांमध्ये रमतो. 'यारा रे' गाण्याच्या प्रत्येक शब्दामध्ये मैत्रीची व्याख्या दडलेली आहे. त्यामुळे हे गाणे तरुणाईला खूपच जवळचे वाटेल.'

दरम्यान, 'कन्नी' चित्रपटामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतसोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हे सर्वजण मित्र दाखवण्यात आले आहेत. हृताला परदेशामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न असते. या स्वप्नात तिला तिचे जवळचे मित्र किती कन्नी बांधतात हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी लोक कुणाची भाकर खातायेत?' निशिकांत दुबे मराठीविरोधात बरळले| पाहा VIDEO

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Manikgad Fort Tourism : नयनरम्य निसर्ग अन्...; पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय ऐतिहासिक किल्ला, एकदा पाहाच...

SCROLL FOR NEXT