The Family Man 3 Google
मनोरंजन बातम्या

The Family Man 3 : मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३'ची वाट पाहत आहात? मग 'ही' मोठी अपडेट वाचा सविस्तर

The Family Man 3 : फॅमिली मॅन वेब सीरिजने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. मनोज वाजपेयीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता त्याच्या तिसऱ्या पर्वाची तयारी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

The Family Man 3 : मनोज वाजपेयी यांची 'द फॅमिली मॅन' ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या वेब सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. दोघांनाही लोकांनी खूप पसंती दिली असून आता याच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मनोज वाजपेयीनी या वेब सिरीजबाबत एक नवीन अपडेट दिले असून त्यांच्या चाहत्यांना थोडी अजून प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे.

'द फॅमिली मॅन 3'चे शूटिंग संपले

मनोज वाजपेयीने 'फॅमिली मॅन 3'चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्यांने याबाबत अपडेट दिले आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे आणि याबद्दलची माहिती दिली आहे.मनोज वाजपेयीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये क्लॅपबोर्डचा फोटो दिसत आहे. त्या क्लॅपबोर्डवर लिहिले आहे, "इट्स अ रॅप." या पोस्टसोबत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले आहे, शूटिंग पूर्ण झाले आहे. "फॅमिली मॅन 3" साठी आणखी थोडी प्रतीक्षा करा. यासोबतच केकचा फोटोही खाली दिसत आहे आणि त्यावर 2024 शूट रॅप लिहिलेले आहे. अभिनेत्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर आता प्रेक्षक 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतीक्षा करू शकत नाहीत.

हे स्टार्स तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत

राज आणि डीकेची ॲक्शन पॅक्ड वेब सिरीज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. यावेळी या मालिकेत मनोज वाजपेयी व्यतिरिक्त प्रियामणी, शरीब हाश्मी, अश्लेषा ठाकूर आणि वेदांत सिन्हा दिसणार आहेत. यावेळीही राज आणि डीके एका मध्यमवर्गीय माणसाची कथा दाखवणार आहेत, जो जागतिक दर्जाचा गुप्तहेर आहे.

मागील दोन हंगाम यशस्वी झाले

'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन 2019 मध्ये रिलीज झाला होता. या वेब सिरीजला उदंड प्रतिसाद मिळाला. दुसरा सीझन 2021 मध्ये रिलीज झाला होता. दुसऱ्या सीझनमध्ये सामंथा रुथ प्रभू दिसली होती. समंथाच्या या वेब सिरीजमधील कामाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या सीझनलाही भरभरून प्रेम मिळाले. आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT