Riteish Deshmukh Post On Manoj Jarange Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh on Manoj Jarange: रितेश देशमुखचे मराठा आरक्षणाबाबत ट्विट, म्हणाला ‘जरांगे पाटलांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो...’

Riteish Deshmukh Post On Maratha Reservation: सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

Chetan Bodke

Riteish Deshmukh Post On Manoj Jarange Patil

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करीत आहेत. गेल्या बुधवारपासून (२५ ऑक्टोबर) अन्न- पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करीत आहे. रविवारपासून मनोज जरांगे- पाटील यांची तब्येत खालावली आहे. सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

नुकतंच बिग बॉस फेम किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आता मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने एक ट्वीट शेअर केलं आहे. रितेश देशमुखने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रितेश देशमुख म्हणाला, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.” (Social Media)

मराठा आरक्षणासंबंधित अभिनेते किरण माने यांनीही पोस्ट शेअर केली आहे. “जरांगे पाटील… या देशामध्ये एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करत आहात! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे,” अशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर केली आहे.

मनोज जरांगे- पाटील यांनी ज्यावेळी पहिल्यांदा उपोषण केले. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचं अल्टिमेटम दिलं होतं. जरांगे- पाटलांनी सरकारला दिलेली मुदत न पाळल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून ते जालन्यामध्ये उपोषण करीत आहेत. राज्यातल्या प्रमुख शहरातून, गल्ली बोळातून मनोज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

SCROLL FOR NEXT