Mangala Movie Poster  
मनोरंजन बातम्या

Mangala Movie : कधीही न ऐकलेली 'मंगला'च्या ॲसिड अटॅकची कथा रूपेरी पडद्यावर दिसणार, पाठमोरी असलेली अभिनेत्री कोण ?

Mangala Movie Poster : महिलांवरील अत्याचार, तसंच महिलांवर होणारे हल्ले याबाबत आजकाल अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना पहायला मिळतात. आता अशातच 'मंगला' नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Apurva Kulkarni

महिलांवरील अत्याचार, तसंच महिलांवर होणारे हल्ले याबाबत आजकाल अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना पहायला मिळतात. काही कथानक सत्य घटनेवर आधारित असतात तर काही काल्पनिक असतात. दरम्यान एका सुप्रसिद्ध गायिकेचा थक्क करणाऱ्या जीवन प्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मंगला' असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं मोशन पोस्टर समोर प्रसिद्ध झालं आहे.. पाठमोरी बसलेली ही महिला नक्की कोण आहे? हे असूनही गुलदस्त्यात आहे.

एका सुप्रसिद्ध गायिकेवर झालेला ॲसिड अटॅक आणि त्यानंतर तिच्या आयुष्यातील खडतर प्रवासाची झुंज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्या काळात ॲसिड ॲटकवर कोणतेही कायदे नसल्याने न्याय मिळवण्यासाठी मंगलाची धडपड या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात मंगलाची भूमिका कोण निभावणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

'रैश प्रोडक्शन आणि फक्त आणि फक्त एंटरटेन्टमेंट यांच्या सोबतीने मंगला चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपर्णा हॉशिंग यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरी यांनी मांडिली आहे. मंगला चित्रपटात पोस्टरवर पाठमोरी बसलेली महिला नेमकी कोण आहे?, ही भूमिका नेमकी कोणती अभिनेत्री साकारणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT