K J Joy Passed Away Twitter
मनोरंजन बातम्या

K J Joy Dies: प्रसिद्ध संगीतकार काळाच्या पडद्याआड!; २०० हून अधिक चित्रपटांना दिलं संगीत

K J Joy Passed Away: प्रसिद्ध मल्याळम संगीत दिग्दर्शक के.जे.जॉय यांचं निधन झालंय.

Chetan Bodke

K J Joy Passed Away

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध मल्याळम संगीत दिग्दर्शक के.जे.जॉय यांचं निधन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१५ जानेवारी) जॉय यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी चेन्नईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जॉय बऱ्याच दिवसांपासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. (Tollywood)

प्रसिद्ध मल्याळम संगीत दिग्दर्शक के.जे.जॉय यांच्या पार्थिवावर बुधवारी (१७ जानेवारी) चेन्नईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जॉय यांच्या निधनामुळे मल्याळम संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. (Singer)

FEFKA डायरेक्टर्स युनियन आणि मल्याळम पार्श्वगायक आणि संगीतकार एमजी श्रीकुमार यांनी जॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. के.जे.जॉय मल्याळम संगीत जगतातील पहिले 'टेक्नो म्युझिशियन' म्हणून त्यांची ओळख आहे. जॉय यांनी २०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिलंय. (Bollywood News)

जॉय यांनी १९७५ मध्ये मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. जॉय यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक गाण्यांना संगीत दिले आहेत. जॉयच्या गाण्यांना कायमच संगीतप्रेमी खूप उत्तम प्रतिसाद द्यायचे. जॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या 'जयन' चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. जॉय यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये सहाय्यक संगीत दिग्दर्शकासाठी काम पाहिले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT