Director Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Director Arrested: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाला अटक, अभिनेत्रीनेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Malayalam Director Arrest: मल्याळम चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ६१ वर्षीय या दिग्दर्शकावर अभिनेत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • मल्याळम दिग्दर्शक रणजित बालकृष्णन अटकेत

  • अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला

  • १३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

  • मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ

मल्याळम चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रणजित बालकृष्णन याना अटक करण्यात आली आहे. रणजित बालकृष्णन हे ६१ वर्षांचे आहेत. त्यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या घटनेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

केरळ पोलिसांनी रणजित बालकृष्णन यांना ३१ मार्च २०२६ रोजी अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ते सध्या एर्नाकुलम उप-कारागृहात आहेत. एका अभिनेत्रीने रणजीत बालकृष्ण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ३० जानेवारी रोजी ते तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आणि त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.

अभिनेत्रीने सुरुवातीला चित्रपटाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती. नंतर तिने कोची पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम पोलिस ठाण्यात दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिग्दर्शकाविरोधात जे गुन्हे दाखल केले आहेत ते अजामीनपात्र आहेत. एक विशेष पोलिस पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामुळे रणजीतच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

रणजित बालकृष्णन हे बऱ्याच वर्षांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ते दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते आहेत. त्यांनी केरळ राज्य चलचित्र अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. रणजित बालकृष्णन यांच्यावर यापूर् देखील लैंगिक छळाचे आरोप झाले होते. २०२४ मध्ये बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा यांनीही त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपांनंतर त्यांनी अकादमीतून राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलं दोषारोपपत्र

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

Diabetes warning signs: हात-पाय वारंवार थंड पडतात? थंडीमुळे होतंय असं समजून दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय मोठ्या आजाराचा संकेत!

SCROLL FOR NEXT