Malaika Arora Saam tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: मलाइकाचा फोटो वापरून पिंपरीत अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

Malaika Arora: बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोराचे आक्षेपार्ह फोटो वापरून अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी आकुर्डी येथील बांधकाम व्यवसायिकावर पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाई केली आहे.

Shruti Vilas Kadam

Malaika Arora: बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोराचे आक्षेपार्ह फोटो वापरून अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी आकुर्डी येथील शुभ डेव्हलपर्स या बांधकाम व्यवसायिकावर पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या स्काय होल्डिंग विभागाने या प्रकरणात ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून, या कारवाईमुळे अनधिकृत जाहिराती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई महापालिकेच्या स्काय होल्डिंग विभागामार्फत करण्यात आली आहे. आकुर्डी परिसरात शुभ डेव्हलपर्स या बांधकाम फर्मने आपल्या प्रकल्पाच्या प्रचारासाठी अभिनेत्री मलाइका अरोरा हिचे छायाचित्र वापरले होते. हे छायाचित्र जाहिरातीत आक्षेपार्ह स्वरूपाचे असून, ते वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या संदर्भात एका सजग नागरिकाने महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर स्काय होल्डिंग विभागाने तपास केला असता, शुभ डेव्हलपर्सने अधिकृत परवानगीशिवाय आणि नियमबाह्य पद्धतीने जाहिरात फलक लावल्याचे समोर आले. त्यानंतर विभागाने मेसर्स अप्सक्वर एचिव्हर्स एलएलपी या संबंधित संस्थेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत आणि आक्षेपार्ह जाहिरातींवर काटेकोर कारवाई करण्यात येत आहे. कोणतीही जाहिरात लावताना संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

या कारवाईनंतर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचे कौतुक केले असून, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह फोटो आणि जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा निर्णय शहरातील अनधिकृत जाहिरातींना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT