Arjun Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Share Arjun Kapoor Photo: मलायकाने फोटो काढताच उशीने झाकलं अर्जुनने अंग; न्युड फोटो व्हायरल

Malaika Arora Instagram Post: मलायकाने अर्जुनचा बिनाकपड्यांमधील फोटो शेअर केला आहे. तर त्याने उशीने शरीर झाकले आहे.

Pooja Dange

Malaika Arora & Arjun Kapoor: बॉलिवूडचे सर्वात चर्चेत असणारे कलप म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे. मलायका अरोराने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा एक फोटो इन्स्टाग्राम शेअर केला आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.

मलायका आणि अर्जुन दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. यावेळी मलायकाने अर्जुनचा बिनाकपड्यांमधील फोटो शेअर केला आहे. तर त्याने उशीने शरीर झाकले आहे.

मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीवर अर्जुनचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मलायकाने एक छोटेसे कॅप्शनही लिहिले आहे आणि म्हटले आहे - माझा आळशी मुलगा. (Latest Entertainment News)

एवढेच नाही तर अर्जुन कपूरने मलायकाची ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मात्र, त्यांनी कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही. या फोटोमध्ये अर्जुन सोफ्यावर बसून आळस देताना दिसत आहे. उशीशिवाय त्याच्या अंगावर कोणतेही कापड दिसत नाही.

मलायका अरोरा 2017 मध्ये अरबाज खानपासून वेगळी झाली आणि तेव्हापासून ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून आपले प्रेम उघडपणे व्यक्त करतात. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा त्यांना टीकेचा सामना करावा लागतो, परंतु या गोष्टींमुळे त्यांना फारसा फरक पडत नाही.

पापाजी विरल भयानी यांनी मलायकाची ही पोस्ट शेअर केली, ज्यावर नेटकरी भरपूर टीका करत आहेत. एकजण म्हणाला, यांना स्वतः विषयी वाईट बोललेले आवडते आणि मग तो आम्हाला ट्रोल करतात. दुसरा म्हणाला, उशी : माझा गैरवापर होत आहे, माय लॉर्ड. या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप काही लिहिले आहे.

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुनने त्याचे प्रेम व्यक्त केले होते आणि फोटो शेअर करत लिहिले होते, नेहमी माझी राहा. 2019 मध्ये, दोघांनी जाहीरपणे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे स्वीकारले होते.

दोघांच्या वयात जवळपास 12 वर्षांचे अंतर आहे आणि यामुळे ते अनेकदा लोकांच्या निशाण्यावर असतात. यादरम्यान आतापर्यंत अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळाल्या आहेत. मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते. मलायकाला अरबाजपासून एक मुलगा अरहान देखील आहे. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT