Malaika Arora SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: ८ तास झोप, दारुला बाय बाय... मलायकाचा नोव्हेंबरचा फिटनेस प्लान पाहिलात का?

Malaika Arora Fitness Tips: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नोव्हेंबरसाठी स्वतःला चॅलेंज देणारी 'टू-डू लिस्ट' पोस्ट केली आहे, जी पाहून तिच्या फिटनेसचे रहस्य समजते.

Shreya Maskar

फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी तिच्या फिटनेस आणि डाएटमुळे चर्चेत असते. ती आपल्या फिटनेसमुळे तरुणाईशी स्पर्धा करत आहे. हेल्दी फूड आणि भरपूर व्यायाम हेच मलायकाच्या ग्लोईंग त्वचेचे रहस्य आहे.

सध्या मलायकाने नोव्हेंबरसाठी स्वतःला चॅलेंज दिली आहे. तिने नोव्हेंबरची 'टू-डू लिस्ट' सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या नोव्हेंबर चॅलेंजमध्ये अल्कोहोल सोडणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे आणि प्रोसेस्ड फूड न खाणे, रात्री आठ नंतर न जेवणे या गोष्टींचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात जीवनातून नकारात्मक लोकांना काढून टाकणे हे उद्दिष्टे देखील तिने डोळ्यासमोर ठेवलं आहे.

मलायका अरोरा आता पन्नाशीत आहे. तरी ती तिशीत असल्यासारखी वाटते. ती आपल्या शरीराची खूप काळजी घेते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत राहते. तसेच तिचे हटके फोटो पाहून चाहते देखील घायाळ होतात. मलायका योगा आणि जिम दोन्ही गोष्टी न चुकता करते. तसेच ती योग्य डाएटसुद्धा फॉलो करते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे. दिवाळीच्या वेळी 'सिंघम अगेन'च्या प्रमोशन दरम्यान त्याने मलायकासोबत ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केलं होते. मलायका आणि अर्जुन एकमेकांना 2018 पासून डेट करत आहेत. मलायका आणि अर्जुन कपूरला वयामुळे अनेक वेळा ट्रोल करण्यात आले. मलायका आणि अर्जुनच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT