Malaika-Arjun Breakup Rumors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika-Arjun Breakup Rumors: मलायका-अर्जुन कपूरचा ब्रेकअप? नेमकं कशावरून आणि कुणामुळं बिनसलं?

Malaika-Arjun Breakup Rumors: अनेकदा रिलेशनमुळे चर्चेत राहिलेले अर्जुन- मलायका नुकतेच ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहे.

Chetan Bodke

Malaika-Arjun Breakup Rumors

कायमच रिलेशनमुळे प्रकाशझोतात असलेल्या अर्जुन- मलायकाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. अनेकदा रिलेशनमुळे चर्चेत राहिलेले अर्जुन- मलायका यावेळी त्यांच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमधील मतभेदाबाबत अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर बोलल्या जात आहेत. एवढंच नाही तर, आता अर्जुनचे नाव सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलासोबत जोडले जात होते. आता या चर्चांवर कुशाने मौन सोडलं आहे.

अर्जुनला डेट करत असल्याच्या वृत्तावर कुशाने नुकतंच प्रतिक्रिया दिली आहे. अफवांवर अभिनेत्री म्हणाली की, “मी स्वत:बद्दल रोज दररोज इतका मूर्खपणा वाचल्यानंतर, मला माझा स्वतःचा परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल अशा चुकीच्या गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. नाहीतर तिच्या सोशल लाइफला खूप मोठा धक्का बसेल.” नुकतंच दिग्दर्शक करण जोहरच्या घरी अर्जुनसोबत मलायका नाही तर, कुशा कपिला स्पॉट झाली होती. तेव्हा पासून सोशल मीडियावर अर्जुन- कुशाच्या रिलेशनची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर करण जोहरच्या पार्टीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काही व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओत अर्जुन कुशाकडे पाहत असताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या फोटोंवरून दोघांच्याही अफेअरची चांगलीच चर्चा रंगत आहे.

दरम्यान कुशाबद्दल बोलायचे तर, तिने काही दिवसांपूर्वी पती जोरावर सिंग अहलूवालियासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या सहा वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोट घेण्याचा निर्णय कुशाने आणि जोरावरने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठीण? VIDEO

SCROLL FOR NEXT