Mahavatar Narsimha SAAM TV
मनोरंजन बातम्या

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

Mahavatar Narsimha Box Office Collection : 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आहे. रक्षाबंधनला चित्रपटाने 'मुफासा: द लायन किंग' सिनेमाला मागे टाकले आहे. एकूण कलेक्शन किती, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'महावतार नरसिम्हा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाजवले आहे.

रक्षाबंधनला 'महावतार नरसिम्हा'ने बंपर कमाई केली आहे.

'महावतार नरसिम्हा' लवकरच 'द लायन किंग'ला मागे टाकणार आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'महावतार नरसिम्हा'ची (Mahavatar Narsimha) क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाने काल (शनिवारी) रक्षाबंधनला अनेक मोठ्या चित्रपटाने मागे टाकून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. लवकरच हा चित्रपट 'द लायन किंग' ला देखील मागे टाकणार आहे. 'महावतार नरसिम्हा' चित्रपट 25 जुलैला रिलीज झाला आहे. 'महावतार नरसिम्हा' चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'महावतार नरसिम्हा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाने रिलीजच्या 16 व्या दिवशी 19.50 कोटींची कमाई केली आहे. एकूण चित्रपटाने 16 दिवसांत भारतात नेट कलेक्शन 145.15 कोटी रुपये कमावले आहेत. तर 150 कोटी रुपये ग्रॉस कलेक्शन केले आहे.

'मुफासा: द लायन किंग' चा रेकॉर्ड ब्रेक

'मुफासा: द लायन किंग' चित्रपट 2024मध्ये रिलीज झाला होता. 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाने 'मुफासा: द लायन किंग'ला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'मुफासा: द लायन किंग' चित्रपटाची भारतात 137.85 कोटी रुपये कमाई झाली. तो भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा ॲनिमेटेड चित्रपट ठरला होता. मात्र आता 'महावतार नरसिम्हा' ने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

'महावतार नरसिम्हा' 'द लायन किंग'चा रेकॉर्ड ब्रेक करणार

2019मध्ये 'द लायन किंग' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने भारतात 158.40 कोटी रुपये कमावले. त्यामुळे 'महावतार नरसिम्हा' 160 कोटींचा टप्पा गाठून लवकरच 'द लायन किंग'चा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

SCROLL FOR NEXT