Gaurav More New Bollywood Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More Bollywood Movie: फिल्टर पाड्याच्या बच्चनची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या टीमसोबतचा व्हिडीओ केला शेअर...

Gaurav More New Bollywood Movie: अभिनेता आणि विनोदवीर म्हणून आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला गौरव मोरे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

Chetan Bodke

Gaurav More New Bollywood Movie

कायमच टेलिव्हिजनसृष्टीमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची कमालीची चर्चा होत असते. अवघ्या काही दिवसातच शोला प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळाली आहे. दोन महिन्यांपूर्वी या शोने ब्रेक घेतला होता, आता पुन्हा एकदा हा शो नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या दमदार कॉमेडीमुळे शोमध्ये प्रसिद्ध असलेला फिल्टर पाड्याचा बच्चन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा गौरव मोरे सध्या एका पोस्टमुळे बराच चर्चेत आला आहे.

अभिनेता आणि विनोदवीर म्हणून आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला गौरव मोरे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून थेट बॉलिवूड चित्रपटामध्ये त्याची वर्णी लागणार असल्यामुळे सध्या त्याची तुफान चर्चा सुरू आहे. गौरव मोरे लवकरच ‘संगी’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकतंच गौरवने ‘संगी’ चित्रपटाच्या टीमबद्दल एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने ‘संगी’च्या टीमचे आभार मानले आहे.

गौरव मोरे आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की, मला इतक्या चांगल्या टीममुळे चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शरीफ भाऊ संजय भाऊ विद्या मॅडम. आता मी या चित्रपटाचा एक भाग आहे. या सर्वांनी माझी व्यवस्थित काळजी घेतली आहे. सुमित कुलकर्णी सरांचे विशेष आभार. या चित्रपटासाठी ज्यांनी माझा विचार केला त्या सर्वांचे मनापासून आभार. संगी लवकरच भेटू.” शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौरवसह चित्रपटातील अन्य कलाकार देखील चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असून चित्रपटाची कथाही अजून प्रेक्षकांसमोर आलेली नाही.

दरम्यान ‘संगी’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर, अभिनेता आणि विनोदवीर गौरव मोरेसह चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, विद्या मालवडे, संजय बिश्नोई आणि शाकिब हाश्मी हे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत कुलकर्णी यांनी केलं आहे. गौरव मोरे चित्रपटामधून झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकत वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT