Nikhil Bane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikhil Bane: हास्यजत्रेच्या निखिल बनेने जिंकली प्रेक्षकांची मने; कोकणात जाऊन केली भातलावणी, अनुभव सांगताना म्हणाला...

Nikhil Bane: लोकप्रिय मराठी कॉमेडी शो "महाराष्ट्राची हास्यजत्रा" मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने सध्या आपल्या मूळगावी कोकणात भातलावणीचा अनुभव घेत आहे.

Shruti Vilas Kadam

Nikhil Bane: लोकप्रिय मराठी कॉमेडी शो "महाराष्ट्राची हास्यजत्रा" मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने हे आपल्या विनोदी टायमिंगसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातो. सध्या तो आपल्या मूळगावी कोकणात आहेत आणि पावसाळ्यातील खरी ग्रामीण परंपरा असलेल्या भातलावणीचा अनुभव घेत आहे.

निखिलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पारंपरिक पद्धतीने चिखलात उभा राहून भातलावणी करताना दिसत आहे. त्याने सांगितले की, हा त्याचा पहिलाच अनुभव आहे आणि चिखलात काम करताना वेगळाच आनंद मिळतो. पावसाच्या सरी, डोंगरांची हिरवाई, मातीचा सुगंध आणि गावकऱ्यांसोबत काम करण्याची मजा या सगळ्याचा त्याने मनमुराद आनंद घेतला.

व्हिडिओसोबत निखिलने लिहिले, “पहिल्यांदाच भातलावणी केली. चिखलात काम करून एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळालं. निसर्गाशी अशी जोडणी हीच खरी श्रीमंती आहे.” त्याच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याचे कौतुक करत म्हटले की, शहरात प्रसिद्धी मिळाल्यानंतरही निखिल आपली मुळे विसरला नाहीत या गोष्टीचे कौतुक.

निखिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या बॅकस्टेजपासून सुरु करुन आता तो त्याची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. त्याचसोबत त्याने Boyz 4, पूर्णिमेचा फेरा (२०२४), चिकीचिकी बूबूमबूम (२०२५) या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रांका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT