Namrata Sambherao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Namrata Sambherao: 'सुखाचा प्रवास केव्हा होईल?...' ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर भडकली नम्रता संभेराव

Namrata Sambherao Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Namrata Sambherao Share Post On Traffic:

मुंबई शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे अनेकदा प्रवाशांना खूप नाहक सहन करावा लागतो. वाहतूकीच्या समस्येवर अनेक जण वारंवार तक्रारी करतात. परंतु अजूनही या समस्येवर कोणताही तोडगा निघालेला नाही. सर्वसामान्यांप्रमाणे ठाण्यात होणाऱ्या वाहतूककोंडीची झळ आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बसली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. याधीही अनेक अभिनेत्यांनी वाहतूकीच्या समस्येवर आपली मतं मांडली होती. अभिजित खांडकेकर, हेमंत ढोमेनंतर आता नम्रतानेदेखील वाहतूक कोंडीवर आपलं मत मांडलं आहे. (Latest Entertainment News In Marathi)

नम्रताने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “काय करायचं घोडबंदर रोडचं , loaded ट्रक टेम्पो पलटी होतायत साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते किमान 95% प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचाही थांगपत्ता लागत नाही कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय ..

सुखसोयी असलेले मोठमोठाले टॉवर झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुखपर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं ह्यावर”

अभिनेत्रीच्या या पोस्टवर असंख्य कमेंट्स आल्या आहेत. सर्वसामान्य लोकांनी नम्रताला पांठिबा दर्शवला आहे. 'आपल्या मनातला संताप मनातच ठेवू शकतो', 'घोडबंदरला कोणीच वाली नाही' अशा संतप्त प्रतिक्रिया नम्रताच्या पोस्टवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT