Dattu More Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dattu More: 'अजून एक नवीन सुरुवात…', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या आयुष्यात आनंदाचा डबल धमाका

Dattu More And Swati Ghunage: दत्तू मोरेच्या (Dattu More) आयुष्यामध्ये आनंदाचे एक नाही तर दोन धमाका झाला आहे. दत्तू मोरेला नुकताच म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळालं. तर दुसरीकडे त्याची डॉक्टर बायको स्वाती घुनागेने नवं क्लिनिक सुरू केले आहे.

Priya More

Dattu More Wife Swati Ghunage:

सोनी मराठीवरील प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा प्रसिद्ध शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या शोच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेला दत्तू मोरे सध्या चर्चेत आला आहे. दत्तू मोरेच्या (Dattu More) आयुष्यामध्ये आनंदाचे एक नाही तर दोन धमाका झाला आहे. दत्तू मोरेला नुकताच म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळालं. तर दुसरीकडे त्याची डॉक्टर बायको स्वाती घुनागेने नवं क्लिनिक सुरू केले आहे. स्वत: दत्तू मोरेने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दत्तू मोरेची पत्नी स्वाती घुनागे ही डॉक्टर आहे. नुकताच तिने ठाण्यात स्वत:चं पहिलं क्लिनिक सुरू केले. या क्लिनिकच्या उद्घाटनाचे फोटो दत्तू मोरेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. दत्तू मोरेने क्लिनकच्या उद्घाटनाचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्य किती कठीण वाटतं असेल तरी तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यश देखील प्राप्त करू शकता. घुनागे हॉस्पिटलनंतर…बायकोचं ठाण्यातलं पहिलं क्लिनिक…अजून एक नवीन सुरुवात…प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा…आणि खूप खूप प्रेम…'

दत्तू मोरेच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते त्याच्यावर आणि त्याची डॉक्टर बायको स्वातीवर शुभेच्छांचा वर्षावं करत आहेत. दत्तू मोरेच्या या पोस्टवर काही सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पोस्टवर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भट्ट आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी दत्तू आणि स्वातीला शुभेच्छा दिल्या आहे.

दत्तू मोरेची बायको स्वाती घुनागे ही स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ आहे. तिचे पुण्यामध्ये स्वत:चे क्लिनिक आहे. घुनागे हॉस्पिटलनंतर स्वातीने ठाण्यामध्ये पहिलं क्लिनिक सुरू केले आहे. स्वाती फक्त डॉक्टरच नाही तर ती सामाजिक कार्यात देखील सक्रिय असते. दत्तू मोरे आणि स्वाती घुनागे यांनी मागच्या वर्षी थाटामाटामध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT