Onkar Bhojne SaamTv
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojane Video: टॅलेंटची आमच्या गावभर चर्चा... अभिनेता ओंकार भोजनेची आणखी एक कविता व्हायरल

Onkar Bhajane New Poem: ओंकार भोजनेच्या कवितेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Onkar Bhajane Video Get viral : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार भोजने याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ओंकार नवनवीन गोष्टी करताना दिसत आहे.

ओंकार झी मराठीवरील 'फूबाईफू' या विनोदी मालिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने ईशा केसकरसह 'सरळ एक कोटी' या चित्रपटामध्ये काम केले. सध्या त्याचे आणि भाऊ कदमचे 'करून गेलो गाव' हे नाटक सुरू आहे.

ओंकारला कवितांची आवड आहे हे आपल्याला मागेच कळले होते. त्याचा 'तुलाच पुरी करायची' या कवितेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. आता त्याच्या कवितेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'सरला एक कोटी' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे भरपूर कौतुक झाले. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ओंकार चिपळूणमध्ये एका कार्यक्रमासाठी गेला होता. तिथे त्याने ही कविता सादर केली आहे.

ओंकार भोजनेची कविता

'टॅलेंटची आमच्या गावभर चर्चा,

नाही खोटेपणाचा आव रे

कुणी निंदा, कुणी भी वांदा

चिपळूण आमचं गाव रे...'

कविता सादर करण्यापूर्वी ओंकारने चिपळूणमधील तरुणांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ओंकार म्हणाला की, आपण सर्व तरुण पिढी आता ज्याप्रमाणे एकत्र आहे, तिचं ऊर्जा आणि एकजूट यापुढेही टिकून राहायला हवी. कारण त्यावरच सर्व अवलंबून आहे. एकट राहून काहीही होत नाही. त्यामुळे आपण एकत्र राहूया.'

ओंकारची ही कविता त्याच्या फॅन पेजच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्याच आले आहे. त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. तसेच त्याला पुन्हा हास्यजत्रेत यायची विनंती करत आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT