Gaurav-Vanita Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav-Vanita Dance Video : 'बडे मिया छोटे मिया'; गौऱ्या-वनीचा अमेरिकेत स्ट्रीट डान्स Video Viral

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Dance Video : गौरव आणि वनिताने अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gaurav-Vanita Dances In America : फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. तर कोळीवाड्याची रेखा म्हणून वनिता खरात लोकप्रिय आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे हे दोघेही प्रसिद्ध झाले आहे. हे दोघे नेहमीच सोशल मीडियावरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.नुकताच गौरव आणि वनिताने अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिका दोऱ्यावर आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकार अमेरिकेतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान गौरवने सोशल मीडियावर वनिता खरातसोबतचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.(Latest Entertainment News In Marathi)

गौरवने शेअर केलेल्या व्हिडिओत गौरव आणि वनिता खरात अमेरिकेतील रस्त्यावर गोविंदाच्या 'बडे मिया छोटे मिया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अमेरिकेतील रस्त्यावर हे दोघेही अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या गाण्यावर मनोसोक्त डान्स करताना दिसत आहे.

गौरवच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गौरवने या व्हिडिओला बडे मिया छोटे मिया असे कॅप्शनही दिले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला आहे. महारष्ट्राची हास्यजत्रेची टीम सध्या परदेशातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना कोणतीही कसर सोडत नाही आहे. अमेरिकेतील शोचे व्हिडिओ नेहमीच कलाकार सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या जागी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT