Shivali Parab Reel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Reel: ‘तू रुसलास का ?’; शिवाली नेमकी कोणाची समजूत काढते?, व्हिडीओवरून होतेय चर्चा

Shivali Parab Post: कायमच आपल्या कॉमडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या एका रिलमुळे चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Shivali Parab Reel

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहचलेल्या अभिनेत्री शिवाली परबचा (Actress Shivali Parab) फार मोठा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रेमधून शिवालीला ‘कल्याणची चुलबुली’नावाने ओळख मिळाली आहे. कायमच आपल्या कॉमडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या एका रिलमुळे चर्चेत आली आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच शिवालीने एका मराठमोळ्या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये आलेल्या कमेंट्समुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Marathi Actress)

अवघ्या काही तासांपूर्वी शिवालीने इन्स्टाग्रामवर ‘खबरदार’ चित्रपटातलं ‘धुमशानं अंगातं आलं’ या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. अभिनेत्रीची या रिलमधील अभिनय चाहत्यांना प्रचंड भावला आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना ‘तू रुसलास का ?’ असं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केलेला आहे. आणि पुढे #shivaliparab #parabshivali #love #réel असे टॅग वापरत तिने रिल शेअर केला आहे. (Social Media)

शिवालीने या रिलमध्ये मल्टी कलरचा डिझायनिंग सिंपल पंजाबी ड्रेस वेअर करत नाकात नथ घालून तिने हा रिल केला आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओच्या कॅप्शनवरून सोशल मीडियावर तिच्या पोस्टची चर्चा सुरू आहे. ‘याला म्हणतात ॲक्टिंग’, ‘कित्ती गोड’, ‘खूपच छान दिसतेय.’, ‘तू कमेंट करत नाहीस म्हणून मी रूसलोय’ अशा कमेंट अभिनेत्रीला चाहत्यांनी केलेल्या आहेत. २ लाख ५९ हजारां इतके चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. २३ हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट केली आहे. (Tv Serial)

शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोबतच ती काही ट्रॅक सॉंगमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटामध्ये छोट्या चंद्राचे पात्र साकारले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT