Prajkta Mali New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Prajkta Mali New Home: मराठमोळी प्राजक्ता माळी चमकली; नव्या घराची मालकीण झाली

Prajkta Mali News: नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी चर्चेत राहिलेली प्राजक्ता एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Prajkta Mali New Home: मराठी टेलिव्हिजनसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Prajakta Mali)चं नाव कायमच आघाडीवर आहे. प्राजक्तानं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आघाडीचे स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता सर्वाधिक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून चर्चेत आली आहे. नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी चर्चेत राहिलेली प्राजक्ता एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतंच तिने स्वत:साठी पुण्यात नवं कोरं घर घेतलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्राजक्ताने पुण्यात नवीन घर घेतलंय. प्राजक्ताने नुकत्याच एका यु ट्यूब शोमध्ये तिने पुण्यात घर घेतल्याची माहिती दिली आहे. एका अलिशान टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर प्राजक्ताने हे घर बुक केलं आहे. प्राजक्ताने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केलीय.

प्राजक्ता माळीचं स्वतःचं घर घेण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या नव्या घराची नेमप्लेट देखील शेअर केली आहे. अभिनेत्रीने पुण्यातील एका टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर फ्लॅट बुक केला आहे. प्राजक्ताचा फ्लॅट क्रमांक १७०४ आहे. (Entertainment News)

Prajkta Mali New Home

प्राजक्ताला नवीन टॉवरचं जे बांधकाम होतंय त्याचं कन्स्ट्रक्शन आणि इमारतीचा प्रशस्त आवार खुप आवडला. त्यामुळे नवीन घराच्या जागेविषयी प्राजक्ता खूप आनंदी आहे. तिला तिच्या घराचा २ वर्षांनी घराचा ताबा मिळणार असून तिने आधीच घरासाठी एक सुंदर नेमप्लेट बनवून घेतली आहे, सध्या तिची ही नेमप्लेट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Marathi Actress)

प्राजक्ता बद्दल बोलायचे तर, प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून येत होती, पण सध्या हा काही महिन्यांच्या विश्रांतीवर गेला आहे. प्राजक्तासोबतच सर्वच सेलिब्रिटीही प्रेक्षकांचे खूपच लाडके आहेत. शो बंद झाल्यामुळे प्रेक्षक शो ला खूपच मिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT