Dattu More Kelvan Saam TV
मनोरंजन बातम्या

Dattu More Kelvan: दत्तू मोरेने पत्नीसोबत असं काही केलं की..., फॅन्स म्हणतात, हे लग्नाआधी करतात, पाहा VIDEO

साम टिव्ही ब्युरो

Dattu More Viral Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा ना फक्त महाराष्ट्रातच तर संपूर्ण जगभरात पाहिला जातो. सदर कार्यक्रम नेहमीच येथील कलाकारांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. याच कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तू हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर एका अनोख्या कारणामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

दत्तू हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत असताना आपण नेहमीच पाहतो. तो सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने लग्नाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावरुन दिली. त्याने (२३ मे) रोजी स्वातीसोबत लग्नगाठ बांधली. सर्वच जोडपी लग्नाआधी केळवणाचे जेवण करतात. मात्र दत्तूने हा नियम मोडलाय.

लग्नानंतर दत्तू आणि त्याची पत्नी केळवणासाठी पोहचलेत. नुकताच त्यांच्या केळवणाचा व्हिडिओ 'इट्स मज्जा' या युट्युब चॅनलवर पोस्ट केला आहे.

दत्तूचे लग्नानंतरचे आगळेवेगळे केळवण

दत्तू मोरेने (Dattu More) काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. त्याने लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना एक आनंदाचा धक्काच दिला. दत्तूने त्याचे लग्न जरी गुपित ठेवले असले तरी आता त्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. लग्न म्हटलं की लग्नासोबतच्या सर्व रिती-परंपरा येतात. त्यात लग्नाआधी केळवण करण्याची एक पद्धत असते. पण दत्तूचे मात्र हे लग्नानंतरचे आगळेवेगळे केळवण करण्यात आले आहे. 'इट्स मज्जा' या युट्युब चॅनलने त्यांचं लग्नानंतरचं केळवण केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये दत्तूने आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. दत्तूने नेहमीच त्याच्या लग्नाबाबत कोणताही उलगडा केला नव्हता. पण या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या लग्नाबद्दल बरच काही सांगितलं आहे. दत्तूची बायको स्वाती ही एक डॉक्टर आहे. ती एक त्वचारोग तज्ञ आहे. तिचे पुण्याला क्लिनीकही आहे.

दत्तू-स्वातीची लव्हस्टोरी

दत्तू व स्वाती हे दोघेही एकमेकांना त्यांच्या एका फ्रेंड्स ग्रुपमध्ये भेटले. ते आधी फक्त मित्र होते. कालांतराने त्यांच्यातील बोलणं वाढलं व त्यांच्यात प्रेम झालं. लग्नासाठी स्वातीनेच दत्तूला विचारल्याचं त्याने सांगितलं. काही महिन्यांच्या रिलेशननंतर दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. लग्नाच्या चर्चेसह आता दत्तू आणि त्याची पत्नी त्यांच्या केळवणामुळे देखील चर्चेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT